(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बारावी फेरपरीक्षा; ऑनलाईन प्रवेश अर्ज वेळापत्रक जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

बारावी फेरपरीक्षा; ऑनलाईन प्रवेश अर्ज वेळापत्रक जाहीर

मुंबई ( १ जून २०१८ ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुन:परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) फेरपरीक्षा जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscborad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

बारावी फेरपरीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरणे आवश्यक आहे.

शुल्क प्रकार

विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख
नियमित शुल्क

सोमवार, दि.04/06/2018 ते बुधवार, दि.13/06/2018

गुरुवार, दि. 14/06/2018 ते सोमवार, दि.18/06/2018

सोमवार, दि. 25/06/2018

विलंब शुल्क

गुरुवार, दि. 14/06/2018 ते सोमवार, दि. 18/06/2018

मंगळवार, दि. 19/06/2018 ते शुक्रवार, दि. 22/06/2018

सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात. श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2018
व फेब्रुवारी-मार्च 2019 अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.

लातूर व कोकण विभाग वगळून इतर विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क बँक ऑफ इंडियात मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन बँक ऑफ इंडियाच्या चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. लातूर विभागीय मंडळाच्या कक्षेतील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी एच.डी.एफ.सी. बँक (HDFC Bank) आणि कोकण विभागीय मंडळाच्या कक्षेतील शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी ॲक्सिस बँक (AXIS Bank) या बँकेत मंडळाच्या जमा खात्यात शुल्क जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2019 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.

नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2018 मध्ये घेतली जाणार नाही याची विद्यार्थी, पालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget