(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कौशल्य सेतू मधील अभ्यासक्रम पूर्णतेनंतर उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी | मराठी १ नंबर बातम्या

कौशल्य सेतू मधील अभ्यासक्रम पूर्णतेनंतर उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी

मुंबई ( ५ जून २०१८ ) : कौशल्य सेतू मधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी मिळणार आहे.

कौशल्य सेतू या कार्यक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस घेता येईल. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून व्यवसाय अभ्यासक्रम विषय उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 4 विषयाचे क्रेडिटस घेता येण्याची सुविधा देण्यात आली आहे. कौशल्य सेतू अंतर्गत विद्यार्थ्याने एका विषयाचा कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केल्यास एका विषयाकरिता 100 गुणांचे क्रेडिट घेता येईल, दोन विषय पूर्ण केल्यास 200 गुणांचे क्रेडिट घेता येईल असे कमाल 4 कौशल्य सेतू विषय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला 400 गुणांपर्यतचे क्रेडिट प्राप्त करता येऊ शकेल.

राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेतील नियमानुसार आवश्यक दोन भाषा आणि ग्रेड विषय उत्तीर्ण करणे कौशल्य सेतू मधील विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget