(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि परिसंस्थांचे होणार शैक्षणिक ऑडीट | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि परिसंस्थांचे होणार शैक्षणिक ऑडीट

शैक्षणिक ऑडीट करण्यासाठी समित्या आणि कार्यबल गटाची स्थापना

मुंबई ( १५ जून २०१८ ) : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 नुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सुमारे 778 महाविद्यालये, परिसंस्था यांचे शैक्षणिक ऑडीट त्रयस्थ व्यवस्थेमार्फत करण्यात येणार असून यासाठी समित्या आणि कार्यबल गटाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय समितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. तर सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास आणि गृह विभागाचे प्रधान सचिव या समितीमध्ये सदस्य असतील. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव या समितीत सदस्य सचिव असतील. याबरोबरच कार्यबल गट (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी या कार्यबल गटाचे अध्यक्ष तर उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने हे सदस्य सचिव असतील. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आर.एस.माळी, वझे केळकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. गोविंद पारटकर आणि मुंबई विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव व्यंकटरमणी या कार्यबल गटाचे सदस्य असतील.

कार्यबल गटाला आवश्यक तेव्हा मार्गदर्शन करणे, त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे कृती आराखडा तयार करुन शासनामार्फत कुलपती यांना सादर करणे. कृती आराखड्याद्वारे ज्या संस्थांनी नियमांचे उल्लंघन केले आहे अशा संस्थांविरुध्द कार्यवाही/उपाययोजना करणे, प्रचलित यंत्रणा आणि कार्यपध्दतीमध्ये सुधारणा/उपाययोजना करणे, महाविद्यालये/संस्था यांच्याकडून संबंधित नियमांच्या उल्लंघनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्यापीठास मार्गदर्शक सूचना देणे अशा समितीच्या कार्यकक्षा ठरविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात संलग्निकरण आणि नुतनीकरण तरतुद आहे. त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था संबंधित तपासणी करणे ही कार्यबल गटाची कार्यकक्षा ठरविण्यात आली आहे. तपासणीमध्ये महाविद्यालय आणि परिसंस्था यांचे अभ्यासक्रम, विद्याशाखा, विषय, तुकड्या यांचे शैक्षणिक ऑडीट कार्यबल गट करेल. कार्यबल गटाने तपासणी करुन दिलेल्या नित्कर्षाच्या आधारे सविस्तर अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करण्यात येईल.

शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व कायम अनुदानित महाविद्यालये यांनी NAA/NBA मूल्यांकनाद्वारे मान्यता प्राप्त केली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असतील. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी आणि महसूलचे उपविभागीय अधिकारी हे सदस्य असतील. तर मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे सहसंचालक सदस्य सचिव असतील. या समितीने कार्यबल गटाच्या निर्देशानुसार काम करावयाचे आहे. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget