(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आरटीई अंतर्गत सन २०१८-१९ प्रवेशाची दुसऱया टप्‍प्‍याकरीता मुदतवाढ | मराठी १ नंबर बातम्या

आरटीई अंतर्गत सन २०१८-१९ प्रवेशाची दुसऱया टप्‍प्‍याकरीता मुदतवाढ

मुंबई ( १४ जून २०१८ ) : शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी ३४७ शाळांमधील २५ टक्‍के राखीव असलेल्या ६ हजार २५९ जागांसाठी पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये दिनांक १० जून २०१८ पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशाची कार्यवाही करण्यात आली होती. सदर जागांकरिता पहिल्या प्रवेश अर्जाच्‍या फेरीमध्ये २ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत.

तसेच दुसऱया सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांना शाळेत प्रवेश घेण्‍यासाठी दिनांक १२ ते २० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे. निवड झालेल्‍या पालकांनी आपल्‍या लॉगीनद्वारे प्रवेशपत्र (Admit Card) व आवश्यक मूळ कागदपत्रे व त्‍यांची झेरॉक्‍स प्रत घेऊन निवड झालेल्‍या शाळेत प्रवेशाकरीता दिलेल्‍या तारखेस हजर रहावे, अन्‍यथा पुढील लॉटरीमधून असे विद्यार्थी बाद होतील. जर निवड झालेल्‍या शाळांनी प्रवेशासाठी सहकार्य केले नाही किंवा प्रवेश नाकारले त्‍याबाबत एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांसाठी उपशिक्षणाधिकारी, खासगी प्राथमिक शाळा विभाग यांचे कार्यालय, पोर्तुगीज चर्चजवळ, एम.टी.एन.एल. मार्ग, भांटेवाडी, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ येथे संपर्क साधावा. तसेच इतर बोर्डाच्या शाळांसाठी शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम), महाराष्ट्र शासन आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नी रोड (पश्चिम) येथे संपर्क साधावा किंवा आपल्‍या लॉगीनद्वारे व मोबाईल ‘ऍप’ द्वारे तक्रार करावी.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget