(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करणार - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करणार - मुख्यमंत्री

मुंबई ( १९ जून २०१८ ) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन मौजे मरोळ मरोशी येथे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यखतेखाली यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, आमदार विद्या चव्हाण, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनिषा म्हैसकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी,संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनाधिकारी उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अस्तित्वात असलेल्या पात्र अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी जागेचा शोध पुर्ण झाला असून लवकरच तिथे त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यासाठी म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन मंडळ एकत्र येऊन काम करणार आहे. पुनर्वसन होईपर्यंत उद्यानातील या नागरिकांसाठी वन विभागाने अस्तित्वात असलेल्या अत्यावश्यक मुलभूत सुविधांची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी तसेच नवीन अत्यावश्यक मुलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भातील प्रस्ताव वनसंवर्धन कायद्यांतर्गत मंजूरीसाठी सादर करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मालाड पूर्व येथील पोयसर नदी रुंदीकरणात (अप्पापाडा) बाधित झोपड्यांपैकी १२९ कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन करण्यासंदर्भातील प्रस्ताव मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात यावा, त्यावर योग्य निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget