(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम | मराठी १ नंबर बातम्या

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

मुंबई ( १५ जून २०१८ ) : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम आखण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना e-Tribe पोर्टलवर https://www.etribevalidity.mahaonline.gov.in ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. असे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या संदर्भात संबंधित समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे हेल्पलाईन नं. 020-26360941 सुरु करण्यात आलेली असून सकाळी 9.00 ते 7.00 या कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दूरध्वनीवरुन वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन होईल. सर्व म्हणजे आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच या मोहिमेच्या कामकाजाचा वरिष्ठ व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जाईल. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्वरीत वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच समित्यांच्या स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या व त्यांचे कार्यक्षेत्र तसेच संपर्क दूरध्वनी खालीलप्रमाणे पुणे विभाग (पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर) 28, क्वीन्स गार्डन, पुणे 1, दूरध्वनी क्र. 020-26336961, ठाणे विभाग (ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालय, वर्तकनगर, ठाणे (पश्चिम), ठाणे, दूरध्वनी क्र. 022-25883503, नाशिक विभाग (नाशिक व अहमदनगर)
आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, नाशिक 422002, दूरध्वनी क्र. 0253-2577059, औरंगाबाद विभाग (औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड, बीड,लातूर व उस्मानाबाद) सेंट लॉरेन्स हायस्कूलजवळ, टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद, दूरध्वनी क्र. 0240-2362901, अमरावती विभाग (अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ) शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोर, सना हाऊस, जुना बायपास रोड, चपराशीपुरा, अमरावती 444602, दूरध्वनी क्र. 0721-2550995, नागपूर विभाग (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया) आदिवासी विकास भवन, गिरी पेठ, नागपूर, दूरध्वनी क्र. 0712-2560031, नंदूरबार विभाग (धुळे, नंदूरबार, जळगाव) शासकीय दूध डेअरी, इमारत, आरटीओ जवळ, नंदूरबार, दूरध्वनी क्र. 02564-210130, गडचिरोली विभाग (गडचिरोली व चंद्रपूर) जिल्हा परिषद कॉलनी, कॉम्पलेक्स, गडचिरोली 442605,
दूरध्वनी क्र. 07132-223179 असे आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget