(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); धारावी पुनर्वसनासह इतर प्रकल्पांसाठी एमबीएम समूहाचे सहकार्य लाभणार | मराठी १ नंबर बातम्या

धारावी पुनर्वसनासह इतर प्रकल्पांसाठी एमबीएम समूहाचे सहकार्य लाभणार

मुंबई ( १० जून २०१८ ) : दुबईतील प्रसिद्ध एमबीएम समूहाने मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्यास सहमती दाखवली आहे. तर डीपी वर्ल्ड समूहाने मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत आणि थुम्बे समुहाने आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहयोग देण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (9 जून रोजी) दुबईत या तिन्ही समूहांशी यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ काल कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात अनेक संस्था, कंपन्यांशी ते संवाद साधणार असून, त्यातून राज्यातील कृषी विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान आधारित उपक्रमांना गती देणार आहेत.

या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल दुबई येथे या शिष्टमंडळाचे आगमन झाले. भारतीय राजदूत नवदीप सुरी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची डीपी वर्ल्डचे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांच्याशी चर्चा झाली. कॉर्पोरेट व्यवहार उपाध्यक्ष अनिल मोहता आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. डीपी वर्ल्डने राज्य सरकारसोबत मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत योगदान देण्याची तयारी दर्शविली. विशेषत: नागपुरात काम करण्यास हा समूह उत्सुक आहे. डीपी वर्ल्ड ही जगातील आघाडीची कंपनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीमध्ये (एनआयआयएफ) भागीदार असलेली कंपनी आहे.

एमबीएम समूहाचे चेअरमन शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची सायंकाळी भेट झाली. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याविषयी शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांनी या भेटीत सहमती दाखवली.

थुम्बे समूहाचे संस्थापक अध्यक्ष थुम्बे मोईदीन यांनी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारसोबत आरोग्यसुविधा क्षेत्रात काम करण्याची तसेच यासंदर्भात सामंजस्य करार करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. मध्यपूर्वेतील प्रभावशाली 100 कंपन्यांच्या यादीत थुम्बेचा समावेश असून, विविध 13 क्षेत्रात हा समूह कार्यरत आहे. सुमारे 80 राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या कंपनीचा शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात प्रवास सुरू आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget