(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय : विधि विद्यापीठांना पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपये निधी देणार | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय : विधि विद्यापीठांना पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपये निधी देणार

मुंबई ( ५ जून २०१८ ) : मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठांना त्यांचा दैनंदिन प्रशासकीय व शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी 2018-19 या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा ठोक निधी दरवर्षी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनियम-2014 मधील तरतुदींनुसार मुंबईमध्ये 2015-16 पासून, नागपूरमध्ये 2016-17 पासून तर औरंगाबाद येथे 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुरु झाले आहे. या विद्यापीठांना त्यांचा दैनंदिन प्रशासकीय व शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी 2018-19 या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे प्रत्येकी पाच कोटी रुपये इतकी ठोक रक्कम दरवर्षी देण्यात येईल. या निधीतून विधि विद्यापीठांना मंजूर आकृतीबंधानुसार भरलेल्या पदांचे वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन आणि अन्य दैनंदिन प्रशासकीय व शैक्षणिक खर्च भागवता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget