(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली मुंबई ( ६ जून २०१८ ) : देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा आज राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात देशात ‘गव्हर्नमेंट इ मार्केटप्लेस’ (जीइएम) चा प्रभावी वापर करून उल्लेखनीय कार्यकरणा-या राज्यांचा आज सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग विभागाच्या सचिव रिता तेवतिया यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने ‘गव्हर्नमेंट इ मार्केटप्लेस’ (जीइएम) च्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी व विक्रीसाठी विशेष मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. जीइएम च्या माध्यमातून देशातील सरकारी व गैरसरकारी संस्था खरेदी व विक्रीचे व्यवहार करतात. महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयासोबत जीइएम या सेवेसाठी सामंजस्य करार केला व या माध्यमातून झालेल्या खरेदी व्यवहारामुळे महाराष्ट्र देशात ‘बेस्ट बायर्स’ राज्य ठरले आहे. जीइएम या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात उद्योग क्षेत्रातील खरेदी व विक्रीच्या व्यवहाराला गती आली आहे. तसेच,पादर्शक व्यवहारामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget