(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू | मराठी १ नंबर बातम्या

सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू

मुंबई ( २७ जून २०१८ ) : सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक व वसई- विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 97 च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यानुसार 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झालू आहे. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे.

या निवडणुकीची सूचना महानगरपालिका आयुक्त दिनांक 4 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे ऑनलाईनरित्या भरण्यासाठी आयोगाने निश्चित केलेली वेबसाईट दि. 4 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजता ते दिनांक 11 जुलै 2018 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ही भरलेली नामनिर्देशनपत्रांची छापील प्रत दिनांक 4 ते 11 जुलै 2018 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत स्वीकारण्यात येतील. रविवार दिनांक 8 जुलै 2018 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक 12 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात येईल. छाननी झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी
मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दिनांक 15 जुलै 2018 रोजी उमेदवारी मागे घेता येणार नाही. दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह
नेमून देण्यात येईल. अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दि. 18 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यक असल्यास दिनांक 1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.30 वा. ते 5.30 वा. या वेळेत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दिनांक 3 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात
येईल तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget