(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 15 जुलै रोजी | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 15 जुलै रोजी

मुंबई ( ५ जुलै २०१८ ) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 8 जुलै रोजी घेण्यात येणार होती. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नेट परीक्षा 8 जुलै रोजीच असल्याने परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा 2018 च्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. आता शिक्षण पात्रता परीक्षा येत्या 15 जुलै रोजी होणार आहे.

राज्यातील इयत्ता 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी साठीच्या सर्व शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती मिळण्यासाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परिक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेण्याची मुदत 15 जुलै पर्यंत आहे. याबाबत सर्व माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget