(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डायल 100 यंत्रणेसह विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण | मराठी १ नंबर बातम्या

डायल 100 यंत्रणेसह विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

मुंबई ( २७ जून २०१८ ) : गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्याच्या वापरातून पोलीस दलाने आपली कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवावी. त्याचबरोबर विविध परिस्थितीत काम करताना पोलीसांनी स्वतःमधील संवेदनशीलता जागृत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुंबई पोलीस दलाच्यावतीने डायल 100 च्या अत्याधुनिक यंत्रणेचे तसेच विविध उपक्रमांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा (एमपीआयएस), ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, एम पासपोर्ट, संवाद ॲप्स, ट्विटर हँडल, मोबाईल सर्व्हेलन्स वाहने आदी उपक्रमांचे लोकार्पण तसेच पोलीस दिदी व मुंबई पोलीस फाऊउंडेशनच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. डायल 100 व मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसाठी एल अँड टी
कंपनीचे सहकार्य लाभले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील उत्तम पोलीस दलांमध्ये मुंबई पोलीस दलाचे नाव घेतले जाते. या नावलौकिकात भर पडेल असे उपक्रम मुंबई पोलीस दलाने सुरू केले आहेत. कायदा सुव्यवस्था राखताना सामान्य माणसाला निर्धोक जगण्याचे व त्यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्याचे काम पोलीस दलाने सेवा म्हणून केले आहे. मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराकडे वाईट शक्तींचे लक्ष असते. परंतु मुंबई पोलिसांच्या सज्जतेमुळे अशा वाईट शक्तींवर वचक बसला आहे.

गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिसांवरील ताण कमी होऊन त्यांचे श्रमही वाचणार आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून देशातील आधुनिक तंत्रज्ञान मुंबई पोलिसांच्या हाती आहे. यामुळे मोर्चे, अतिवृष्टी, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ कार्यवाही करता येत आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून अपराधसिद्धीचे प्रमाणही वाढत आहे. डायल 100 या यंत्रणेमध्ये केलेल्या नव्या सुविधामुळे अधिक जबाबदारीने, थेटपणे व अतितात्काळ पीडितांना मदत पोचविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापनही करता येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांचे मनुष्यबळ व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गुन्हे व गुन्हे अन्वेषण नेटवर्क व यंत्रणा (CCTNS) यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे नमूद करून फडणवीस म्हणाले, मुंबई पोलिसांनी तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम व सुंदर वापर सुरू केला आहे. याचबरोबर पोलीस दिदीमुळे बाल लैंगिक अत्याचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलिसांचे जीवनमान सुखकर व्हावे,यासाठी गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
घेतले आहेत. मुंबई पोलीस फाऊंडेशन हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. उत्तम आहेत. न्यूयॉर्कनंतर पोलीस फाउंडेशन तयार करणारे मुंबई पोलीस दल हे पहिलेच पोलीस दल आहे. यामाध्यमातून पोलिसांनी अनेक नवनवीन उपक्रम, सुविधा देण्यात येणार आहेत. याचबरोबर पोलिसांची शासकीय निवासस्थाने,
घरबांधणीसाठी अग्रीम असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, आमदार व प्रतोद राज पुरोहित, आमदार अमीन पटेल, मुंबईचे महापौर विश्वनाथ
महाडेश्वर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी संचिका पांडे, कॉन्स्टेबल सोहन भुसाळकर, कॉन्स्टेबल प्रशांत धस, पोलीस दिदी उपक्रमाबद्दल सत्यमेव जयतेच्या दिग्दर्शिका स्वाती चक्रवर्ती, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक तपस्वी मगदूम आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

डायल 100 ची वैशिष्ट्ये

अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज

दूरध्वनी करणाऱ्याचा पत्ता शोधण्यासाठी पेट्रोलिंग वाहनांमध्ये मोबाईल डाटा टर्मिनल

जीपीएसयुक्त वाहन शोध यंत्रणा

आपत्ती व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही यंत्रणायुक्त

घटनास्थळाचा पत्ता शोधणारे ऑटोमेटिक कॉलर लोकेशन आयडेटिफिकेशन

1 लाख दूरध्वनी हाताळणी क्षमता

कमीत कमी वेळात तातडीची मदत पोचविण्यास तत्पर

मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन

मुंबई पोलिसात सध्या 5 आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन उपलब्ध

पाचही वाहनामध्ये कमांड कंट्रोल सेंटरची क्षमता

सीसीटीव्हीद्वारे मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्षाला थेट प्रक्षेपण पाठविण्याची सोय

तत्पर सेवा व प्रतिसाद देण्यासाठी मोबाईल व्हॅनचा उपयोग
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget