मुंबई ( ३ जुलै २०१८ ) : अंधेरी स्टेशनवरचा पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी या स्टेशनमधून पहिली लोकल रवाना झाली आहे.
अंधेरी रेल्वे स्टेशनवरून पश्चिम आणि पूर्वेकडे जाणारा पुलाचा भाग आज सकाळी कोसळला. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे. पूल कोसळण्याच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. कोसळलेल्या पुलाचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ, मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुलाचा भाग कोसळल्याने ओव्हर हेड वायर तुटल्या आहेत.
गोरेगाव ते वांद्रे दरम्यानची पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. वांद्रे ते चर्चगेट लोकल वाहतूक मात्र सुरू आहे. तसेच गोरेगाव ते विरार वाहतूक देखील सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेने कळवले आहे.
दरम्यान, संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेची फास्ट लाईन सुरु होणार आहे. तर स्लो लाईन सुरु व्हायला मध्यरात्री १२ वाजणारेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तीनजणांना फ्रॅक्चर झाले आहे. एकूण चार पुरुष आणि एक महिला यात जखमी झाले आहेत. द्वारकाप्रसाद शर्मा, मनोज मेहता, हरिश कोहाटे, गिंधम सिंघ अशी जखमी झालेल्या पुरुषांची नावे आहेत. तर एक महिला जखमी आहे. रुळावरील ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मोटरमनचा गौरव करणार
पूल कोसळत असताना पाहताच मोटरमन चंद्रशेखर सावंतने लोकल थांबवली. मोटरमन सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली. सावंत यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
मुंबईतल्या ४४५ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
आजच्या दुर्घटनेबद्दल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी खेद व्यक्त केला आहे. मुंबईतल्या ४४५ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुढच्या ६ महिन्यांमध्ये पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचे गोयल म्हणाले. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून याचा रिपोर्ट १५ दिवसात येईल, असे गोयल यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा