(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); "बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे भरपूर वाचन करा!" - राज ठाकरे | मराठी १ नंबर बातम्या

"बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे भरपूर वाचन करा!" - राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या हस्ते मालाडमध्ये मनसेच्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेचं शानदार उदघाटन
मुंबई ( ८ जुलै २०१८ ) : "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे पुस्तकं वाचली त्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तकं वाचा, अभ्यास करा, सुशिक्षित व्हा" असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. मालाडच्या कुरार व्हिलेजमधील आप्पापाडा येथे मनसेने सुरू केलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि अभ्यासिकेचं त्यांच्या हस्ते आज रविवारी दुपारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भर पावसात राज ठाकरे येणार म्हणून हजारो तरुण-महिला उपस्थित होत्या. "हे ग्रंथालय म्हणजे मनसेचा एक स्तुत्य उपक्रम आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा", असं आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केलं. ​

एखादं सुसज्ज ग्रंथालय हेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं यथोचित स्मारक बनू शकेल, असा विचार नेहमी आपल्या भाषणांतून मांडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व अभ्यासिकेचे शानदार उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण मुंबई महापालिका कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष भास्कर परब यांच्या पुढाकाराने हे ग्रंथालय साकार झाले आहे. ग्रंथालयात युपीएससी,एमपीएससी आदी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी हजारो पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 
"आप्पापाडा हा गरीब, कष्टकरी मराठी माणसांचा परिसर आहे. मी स्वत: आप्पापाडातच लहानाचा मोठा झाल्यामुळे या परिसरातल्या गरीब मुला-मुलींना शिक्षण घेताना, करिअर घडवताना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्याची मला पूर्ण कल्पना आहे. इथल्या मुलांना केंद्र तसंच राज्य सरकारतर्फे घेतल्या जाणा-या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी हे सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे" असं मनसेचे भास्कर परब यांनी यावेळी सांगितलं. 

विशेष म्हणजे, या वातानुकूलित ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही बनविण्यात आली आहे. या अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास करु शकतील. मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती-चरित्रे-ऐतिहासिक पुस्तकं, विविध कायद्यांची माहिती देणारे ग्रंथ, युपीएससी-एमपीएससी-रेल्वेभरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी विविध विषयांवरील संदर्भ पुस्तकं, अशा हजारो पुस्तकांनी हे ग्रंथालय सज्ज आहे, असंही भास्कर परब यांनी सांगितलं.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget