(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधान परिषद कामकाज | मराठी १ नंबर बातम्या

विधान परिषद कामकाज

विधिमंडळ परिसरातील सुरक्षा अधिक मजबुत करण्याचे सभापतींचे निर्देश

नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : विधिमंडळ परिसरातील सुरक्षा अधिक मजबुत करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत दिले.

विधिमंडळ परिसरात मंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळांनी मंत्र्यांना घरी भेटावे, विधिमंडळ परिसरात विक्रेत्यांकडे काम करणाऱ्या कामगारांची पोलीसांनी कसून चौकशी करावी. विक्रेत्यांच्या वस्तूंची संबंधित यंत्रणेने तपासणी करावी. प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र असणे, बाळगणे आवश्यक आहे, अशा सूचनाही सभापती यांनी दिल्या.

ससून रुग्णालयाच्या नर्सेसना संप करण्यावर बंदी

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांचे काम अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असल्याने त्यांना संप करण्यास न्यायालयाने बंदी घातलेली आहे. सध्या सुरु असलेला पुण्यातील ससून रुग्णालयातील नर्सेसचा संप बेकायदेशीर असून शासनाने संपास मनाई केल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत निवदेन करताना सांगितले.

राज्यभरातील पूल आणि रस्त्यांची दुरुस्ती

राज्यातील पूल आणि रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले. राज्यातील नादुरुस्त पूल आणि खचलेल्या रस्त्यांबाबत सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचारला होता. पाटील म्हणाले, राज्यातील जवळपास सर्वच मोठ्या नदीवरील पुलांना सेन्सर बसविले आहेत. त्यामुळे धोक्याची सूचना संबंधित यंत्रणेला आणि परिसरातील 50 महत्वाच्या व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना एसएमएस द्वारे सूचित केले जाते. पूरस्थिती वाढल्याने कोकणातील जगबुडी आणि सावित्री या नद्यांवरील पूल वाहतुकीस बंद केले आहेत. तसेच पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विधान मंडळ परिसरातील विद्युत पुरवठा सुरळित राहील. पाण्याचा निचरा योग्य होईल, याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget