(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधान सभा इतर कामकाज : भटक्या समाजाच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन योजना करणार - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या

विधान सभा इतर कामकाज : भटक्या समाजाच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन योजना करणार - मुख्यमंत्री

नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात येणार असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. भटकंतीने व्यवसाय करणाऱ्या समाजाच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन योजना तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत सांगितले.

या संदर्भात सदस्य भारत भालके यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, या घटनेमुळे माणसांमधील राक्षसी प्रवृत्ती कशी असते, हे पाहायला मिळाले. अफवेच्या माध्यमातून पाच जणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती पंचायत समिती सदस्यांनी दूरध्वनीवरुन पोलीसांना दिली होती. हे गाव धुळ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आतमध्ये आहे. या घटनेत जे लोकं अमानुषपणे मारहाण करताना व्हिडीओ फुटेजमध्ये दिसून येत आहे. त्यातील प्रत्येकाला अटक करण्यात येत आहे. भटकंती करणारा डवरी गोसावी समाज याबरोबरच अन्य समाज जे भटकंती करुन व्यवसाय करतात, त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल आणि भटक्या समाजाच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राईनपाडा घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांचे पूनर्वसन राज्य शासन करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget