(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याकरिता आयआयटी कडील तंत्रज्ञानाचा वापर महापालिकांनी करावा - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या

रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याकरिता आयआयटी कडील तंत्रज्ञानाचा वापर महापालिकांनी करावा - मुख्यमंत्री

नागपूर ( १० जुलै २०१८ ) : रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याकरिता आयआयटी कडील तंत्रज्ञानाचा वापर महापालिकांनी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

सदस्य संतोष दानवे यांनी मुंबईत दरवर्षी रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महापालिका
क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी यावर्षी साडे नऊ कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी विशिष्ट रसायने वापरुन नवीन पद्धतीचे मिश्रण तयार केले आहे. ते पावसात देखील वापरता येते. बुजविलेले खड्डे पावसाळ्यात तग धरु शकतील अशा शित डांबर मिश्रीत खडीची चाचणी घेण्यात आली आहे. या खडीचे उत्पादन महापालिकेच्या मालकीच्या अस्फाल्ट संयंत्रातून करण्याकरिता त्यात योग्य असे बदल करण्यात आले आहेत. मुंबईत 1941 किलोमिटर लांबीचे रस्ते असून त्यात मुंबई महापालिकेच्या अखत्यारित 1200 किलामिटर लांबीचे डांबरी रस्ते आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget