(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधान सभा : ससून रुग्णालयातील तंत्रज्ञ, परिचारिकांच्या संपास मेस्मा लागू - वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण | मराठी १ नंबर बातम्या

विधान सभा : ससून रुग्णालयातील तंत्रज्ञ, परिचारिकांच्या संपास मेस्मा लागू - वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील डॉक्टरांना सहकार्य करणारे तंत्रज्ञ, परिचारिकांच्या संपास राज्य शासनाने ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (मेस्मा) लागू केला असून या कर्मचाऱ्यांना दि. 7 जुलै 2018 पासून संपास मनाई केली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली. बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील परिचारिकांचे प्रशासकीय कारणास्तव झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी दि. 4 जुलै 2018 पासून कामबंद आंदोलन होते.

तसेच कामबंद आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने दि. 3 जुलै 2018 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात राज्य सरकारने रुग्णांचे हित विचारात घेता महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण आणि संबधित कर्मचारी यांनादेखील संप करण्यास बंदी घालण्याबाबत शासन स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे नमूद केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 3 जुलै 2018 रोजी चे अंतिरम आदेश व रुग्णसेवेवर होणारा विपरित परिणाम विचारात घेता, बै.जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील डॉक्टरांना सहकार्य करणारे तंत्रज्ञ, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांच्या संपास लोकहिताच्या दृष्टिने बंदी घालणे आवश्यक असल्याची शासनास खात्री झाल्याने राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांच्या संपास दि.7 जुलै 2018 पासून मनाई केली आहे. त्याचप्रमाणे आदेश दि. 6 जुलै 2018 रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget