नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : महात्मा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजना यांच्या समन्वयाने राज्यातील अधिकाधिक व्यक्तींना लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या या दोन्ही योजनांद्वारे राज्यातील अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळेल यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी ज्या भागातील रुग्णालयांची संख्या कमी आहे तेथील रुग्णालयांचा समावेश नवीन टेंडरमध्ये करुन त्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील नामवंत रुग्णालयांचाही यात समावेश करण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच या योजनेचा गैरवापर करण्याऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आबिटकर यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा