(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधान सभा इतर कामकाज | मराठी १ नंबर बातम्या

विधान सभा इतर कामकाज

वाळू उपशासंदर्भात अंमलबजावणीसाठी कडक धोरण तयार करणार - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : राज्यात वाळू उपशासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्यासाठी धोरण तयार करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून वाळू चोरी रोखताना होणाऱ्या हल्ल्यांपासून रक्षण करताना आता तहसिलदार व तलाठी यांना खासगी सुरक्षा रक्षक वापरण्याची परवानगी देण्याबाबत शासन विचार करीत आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान सभेत सांगितले.

विधान सभेत आज महसूल व वन, कृषी, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, ऊर्जा व कामगार या विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्याला महसूल मंत्री म्हणून उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.
1 ऑक्टोबरपासून हायब्रीड ॲन्युटी रस्त्यांच्या कामांना सुरुवात -सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्यांना उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले, राज्यात 1 ऑक्टोबर पासून हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. यासंदर्भात 92 निविदा अंतिम करण्यात आल्या
आहेत. गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी निविदा काढल्या होत्या. त्याच ठेकेदारांना या वर्षी खड्डे भरण्याचे काम दिले जाईल. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार नाही.

वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाई -वनमंत्री
 
वन विभागाच्या मागण्यांवर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात वन्य जीवांच्या हल्ल्यांमध्ये बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना पूर्वी आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जात असे. त्यात आता दोन लाख रुपयांनी वाढ करुन ही भरपाई दहा लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामध्ये रोख तीन लाख रुपये तर सात लाख रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या नुकसान भरपाईत देखील वाढ करण्यात आली असून 25 हजारांवरुन ही रक्कम आता 40 हजार एवढी करण्यात आली आहे. 

दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती करणार - शिक्षण मंत्री

शिक्षण व क्रीडा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, येत्या दोन महिन्यांत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 18 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. यामुळे शिक्षण संस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती करावी लागणार आहे. 
राज्यातील अर्धवट क्रीडा संकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. 30 खेळाडूंना थेट शासनात नियुक्ती देण्यात आली असून 11 हजार 460 खेळाडूंची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.

15 ऑगस्टपासून ‘एक शेतकऱ्यांना एक ट्रान्सफार्मर’ योजनेची सुरुवात - ऊर्जामंत्री

ऊर्जा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, वीज हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून काही ठिकाणी हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत आहे. ते 15 टक्क्यांपर्यंत
आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन लाख शेतकऱ्यांना पेड पेडींग अंतर्गत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून ‘एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर’ ही उच्च वीज वितरण प्रणाली योजना सुरु करण्यात येणार असून त्यामुळे कृषीसाठी शाश्वत वीजपुरवठा मिळणे शक्य होणार आहे. यावेळी पदुम मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विभागाच्या मागण्यांवर उत्तरे दिली. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget