(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद : सूर्या प्रकल्पाबाबत समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषद : सूर्या प्रकल्पाबाबत समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नागपूर ( १० जुलै २०१८ ) : सूर्या (जि. पालघर) धरणातील पाणी आरक्षण, सिंचन क्षेत्रात कपात होऊ न देता पिण्याचे पाणी आरक्षण करणे इ. बाबतची उपाय योजना करणे तसेच सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करुन सिंचन क्षेत्रात वाढ करणेबाबत नेमलेल्या समितीच्या शिफारसीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य रवींद्र फाटक यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. महाजन म्हणाले, राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुर्या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात कमीत कमी कपात करण्यासाठी, वितरण प्रणाली सुधारणेसह, सिंचनासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच पर्यायी जलस्त्रोत निर्माण करण्याच्या आवश्यकतेबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये प्रस्तृत विषयाचा अभ्यास करण्याबाबत विविध विभागांची सचिव स्तरावर समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सहा महिन्यांच्या आत मिळणार असून त्यानंतर सूर्या प्रकल्पाबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल. या चर्चेत सदस्य सर्वश्री आनंद ठाकूर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget