नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेत शपथ दिली.
या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सर्वश्री कपिल हरिश्चंद्र पाटील, (मुंबई विभाग शिक्षक मतदार संघ), निरंजन वसंत डावखरे, (कोकण विभाग पदवीधर मतदार संघ), किशोर भिकाजी दराडे, (नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ), विलास विनायक पोतनीस, (मुंबई विभाग पदवीधर मतदार संघ) यांचा समावेश आहे. यावेळी सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकात पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा