(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधान सभा : प्रश्नोत्तरे - वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या प्रादेशिक आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर बैठक - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या

विधान सभा : प्रश्नोत्तरे - वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या प्रादेशिक आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर बैठक - मुख्यमंत्री

नागपूर ( ९ जुलै २०१८ ) : वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या 70/30 च्या प्रादेशिक आरक्षणाबाबत विधान सभा अध्यक्ष यांच्या दालनात लवकरात लवकर बैठ‍क घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही असा सर्व मान्य तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबत आमदार अमिता चव्हाण, सदस्य सर्वश्री डी. पी. सावंत, प्रतापराव चिखलीकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नीटचा कायदा अंमलात असून त्यासाठी राज्याला वेगळा कायदा करता येणार नाही. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांवर
अन्याय होणार नाही यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांबाबत आरक्षणात कपात केली जाणार नाही, असे त्यानी उपप्रश्नास उत्तर देताना आश्वस्त केले. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सदस्य सर्वश्री डी. पी. सावंत, सुधाकर देशमुख, राजेश टोपे, चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget