(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उद्योग क्षेत्रातील माहितीची उपलब्धता आणि पारदर्शितेत महाराष्ट्र देशात नंबर १ | मराठी १ नंबर बातम्या

उद्योग क्षेत्रातील माहितीची उपलब्धता आणि पारदर्शितेत महाराष्ट्र देशात नंबर १

नवी दिल्ली, १० : केंद्र शासन व जागतिक बँकेने उद्योग क्षेत्रासाठी ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारावर महाराष्ट्राने बाजी मारली आहे. उद्योग क्षेत्रात माहितीचे सुलभीकरण व पारदर्शिता निर्माण करण्यात राज्याने १०० पैकी १०० गुण अर्जित करून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.

येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या भारतातील विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या कामगिरीवर आधारित क्रमवारी जाहीर करण्यात आली.

उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी आज ही क्रमवारी जाहीर केली. जागतिक बँकेच्या व्यापार व गुंतवणूक विभागाच्या संचालक कॅरोलीन फ्रेऊंड व उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.

१०० गुण मिळविणा-या देशातील ९ राज्यात महाराष्ट्र

‘इज ऑफ डुइंग बिजनेस’च्या माध्यमातून देशातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने देशात विविध उपक्रम सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून उद्योग धोरण व प्रोत्साहन विभाग व जागतिक बँकेच्या वतीने उद्योग मानक घालून दिले असून त्यानुसार राज्यांच्या कार्याचे मुल्यमापन केले आहे. यासाठी व्यापार सुधारणा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये उद्योगात सुधारणा करणे, कृती कार्यक्रम आखणे, धोरण आखणे, नियामक प्रक्रियेचा अवलंब करणे अशा एकूण १२ प्रकारात ३७२ शिफारशी करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रासह देशभरातील ९ राज्यांना विविध मानकांसाठी १०० गुणांसह उत्कृष्ट राज्य म्हणून घोषीत करण्यात आले.

महाराष्ट्रासह मालमत्ता नोंदणीत छत्तीसगड, बांधकाम परवानगीत राजस्थान, कामगार विषयक नियमांमध्ये पश्चिम बंगाल, उद्योग क्षेत्रातील पर्यावरणीय नोंदणीत कर्नाटक, जमीन उपलब्धता व वाटपात उत्तराखंड आदि ९ राज्य १०० गुणांसह देशात अव्वल ठरले आहेत.

यावेळी विविध चार श्रेणींमध्ये उद्योग मानकांच्या अंमलबजावणीत अग्रेसर राज्यांची नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या श्रेणीत सर्वोत्तम ९ , दुस-या श्रेणीत उत्तम ६ , तिस-या श्रेणीत वेगवान प्रगती करणारे ३ आणि
प्रगतीपथावरील १८ राज्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget