(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भेलसई गावचे समाजसेवक नामदेव पांडुरंग तांबे यांचे निधन | मराठी १ नंबर बातम्या

भेलसई गावचे समाजसेवक नामदेव पांडुरंग तांबे यांचे निधन

रत्नागिरी ( २७ ऑगस्ट २०१८ ) : तालुका खेड येथील भेलसई गावचे सुपुत्र,समाजसेवक नामदेव पांडुरंग तांबे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुले असा परिवार आहे.

त्यांनी ऐन तालुक्यात नेते बी. सी. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीत डिलाईल रोड विभागातून काम करण्यास सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेत सेवेत असताना विख्यात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समवेत कामगार चळवळीत काम केले. १९९३ नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या संघटनेत प्रिं वामनराव महाडीक यांच्या समवेत त्यांनी अनेक वर्षे काम केले. महाराष्ट्र शासनाने सन १९९६-९९ या कालावधीसाठी त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश स्मारक समिती ( तळवट, धामणंद, कासई, भेलसई ), सातगांव बौध्द समाज सेवा संघ, बौध्दजन मंडळ मुंबई, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आदी संस्थामध्ये विविध पदावर त्यांनी काम केले होते.

शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी खेड तालुक्यात शिवशक्ती - भिमशक्ती या बाळासाहेबांच्या संकल्पनेतील चळवळीत त्यांनी प्रमुख पदावर काम केलेले होते. तसेच गावामधील विकासकामे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून अनेक वाद विवाद मिटवून गावात सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. सामाजिक, धार्मिक, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या या समाजसेवकाच्या आकस्मित जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget