(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जिल्ह्यात डिसेंबर 2018 मध्ये लातूर ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार - संभाजी पाटील निलंगेकर | मराठी १ नंबर बातम्या

जिल्ह्यात डिसेंबर 2018 मध्ये लातूर ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार - संभाजी पाटील निलंगेकर

लातूर ( २९ ऑगस्ट २०१८ ) : जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करण्यासाठी विविध क्रीडा प्रकारांच्या सोयी-सुविधा खेळाडुंना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे एशियन व ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी नावलौकिक निर्माण करावा यासाठी डिसेंबर 2018 पासून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंसाठी लातूर ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित विविध विकास कामांचे उदघाटनप्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, आंतरराष्ट्रीय खेळाडू पद्माकर फड, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विश्वनाथ गायकवाड, क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसूळ आदिसह क्रीडा मार्गदर्शक पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वानी एकत्रीतपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याचाच एक भाग म्हणून डिसेंबर 2018 मध्ये लातूर ऑलिम्पीकचे आयोजन करुन विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांतर्गत क्रीडा स्पर्धेचे लातूर येथे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट निर्माण करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाणार असून क्रीडा संकुलात निर्माण केलेल्या सोयी-सुविधांचा खेळाडूंनी व नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच येथील सुविधांचा वापर करुन
आरोग्य सुदृढ ठेऊन “हम फिट तो देश फिट” चा नारा प्रत्येकाने जोपासण्याचे आवाहन निलंगेकर यांनी केले.

क्रीडा संकुल हे क्रीडा कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर काणत्याही कार्यक्रमांसाठी यापुढे उपलब्ध करुन दिले जाणार नाही. तसेच विविध खेळांच्या माध्यमातून सांघिक भावना वाढीस लागते. त्यामुळे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी गोल्ड चित्रपट पाहण्याची सूचना निलंगेकर यांनी केली. त्याप्रमाणेच विभागीय क्रीडा संकुलासाठी 32 कोटीचा निधी मंजूर असून या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी क्रीडा विषयक जागतिक दर्जेच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रकारात लातूर जिल्ह्याचा नावलौकिक निर्माण केलेल्या खेळाडूंमध्ये ग्रामीण भागातील 90 टक्के खेळाडू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये खेळाडूंना सुदृढ
आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना निलंगेकर यांनी करुन मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त आज साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्हा क्रीडा संकुल समिती मार्फत खेळाडू व नागरिकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली. यात ॲथलेटीक्स साठी 400 मीटरचा ट्रॅक, ओपन जीम, फीटनेस व रिहॅबॅलीटेशन सेंटर, रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी हायमास तीन ते 10 वर्ष वयोगटातील बालकांसाठी बाल शिवाजी ॲडव्हेंचर पार्क आदि सुविधा दिल्या जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू फड यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आला त्याचप्रमाणेच 14
वर्ष व 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा नैपुण्य वाढविण्यात योगदान देणाऱ्या शाळांना आर्थिक मदत देऊन गौरव करण्यात आला.

प्रारंभी क्रीडा संकुलातील फिटनेस व रिहॅबीलटेशन सेंटर तसेच वॉकींग पाथवरील हायमास दिव्याचे लोकार्पण निलंगेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उद्धव फड यांनी केले तर आभार क्रीडा उपसंचालिका मोराळे यांनी मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget