मुंबई ( २७ ऑगस्ट २०१८ ) : केरळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या १०० तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाचे आज भारतीय वायुदलाच्या दोन विशेष विमानांनी मुंबईत आगमन झाले. दरम्यान, महाराष्ट्राने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्यसेवेबद्दल केरळ सरकारने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली सोमवार २० ऑगस्ट रोजी वायुदलाच्या विशेष विमानांद्वारे १०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हे पथक केरळला रवाना झाले होते. या पथकाने केरळातील पठणमथीट्टा, एर्नाकुलम, त्रिचूर, अल्लेप्पी या जिल्ह्यात २० हजार ४०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले, त्याशिवाय हजारो रुग्णाचे मानसिक समुपदेशन केले. या मदतकार्यात सुमारे ४ टन औषधांचा साठा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला होता. जे. जे. हॉस्पिटल, मुंबई तसेच ससून हॉस्पिटल, पुणे येथील तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या या पथकाने केरळच्या गावागावात जाऊन दर्जेदार आरोग्यसेवा पुरविली. महाराष्ट्र सरकारने पुरविलेल्या आरोग्य सेवेबद्दल केरळच्या आरोग्यमंत्री आर. के. शैलजा व सार्वजनिक बांधकाममंत्री जी. सुधाकरन यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन व त्यांच्या पथकाचे विशेष आभार मानले आहेत. केरळच्या पूरग्रस्त भागातील रुग्णांची मनोभावे अहोरात्र सेवा केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी या पथकातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या सहायकांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा