(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या शिष्यवृत्तीची रक्क्म झाली दुप्पट | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या शिष्यवृत्तीची रक्क्म झाली दुप्पट

मुंबई ( २८ ऑगस्ट २०१८ ) : केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 6 हजार रुपये शिष्यवृत्तीत वाढ करुन ती आता 12 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना (National Means cum Merit Scholarship Scheme - NMMSS) सन 2008 पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आतापर्यंत दरवर्षी 6 हजार रुपये
शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून 4 वेळा देण्यात येत होती आता मात्र दरवर्षी एकाचवेळी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येणार आहे. NMMSS परीक्षेत Scholastic Aptitude Test (SAT) आणि Mental Ability Test (MAT) अशा दोन्हींमध्ये मिळून किमान 40 टक्के (32 टक्के अजा/अज विद्यार्थ्यांकरिता) गुण असणे आवश्यक असल्याने यापूर्वीची प्रत्येक विषयात 40 टक्के गुण आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget