(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हातमाग विणकर जनगणना नोंदणीसाठी आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

हातमाग विणकर जनगणना नोंदणीसाठी आवाहन

मुंबई ( २७ ऑगस्ट २०१८ ) : चौथी राष्ट्रीय हातमाग विणकर जनगणना 2017, देशात आयोजित करण्यात आलेली आहे. या गणनेचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये अंतिम टप्प्यात असून सर्व हातमाग विणकर तसेच संलग्न विणकर/मजूर यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, या जनगणनेत ज्या विणकरांचा समावेश झालेला नसेल त्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी किंवा आपल्या नजीकच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय अथवा प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) यांचे कार्यालयाशी दि. 30 ऑगस्ट 2018 पूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग यांनी केले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी www.handloomcensus.org हे संकेतस्थळ आहे. तसेच उपसंचालक कार्यालयाचा पत्ता प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई, 7वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601, व दू.क्रं. 022-25405363 असा आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget