(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शिरोळ नगरपरिषदेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान | मराठी १ नंबर बातम्या

शिरोळ नगरपरिषदेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान

मुंबई ( ११ सप्टेंबर २०१८ ) : कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2018 रोजी मतदान; तर 22 ऑक्टोबर 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, शिरोळ नगरपरिषदेच्या अध्यक्ष व 17 सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. नामनिर्देनपत्रे 24 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देनपत्रांची छाननी 1 ऑक्टोबर 2018 रोजी होईल. नामनिर्देनपत्रे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget