(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); गिरगाव चौपाटी येथील गणेश विसर्जन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती | मराठी १ नंबर बातम्या

गिरगाव चौपाटी येथील गणेश विसर्जन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई ( २३ सप्टेंबर २०१८ ) : गणेशभक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात तसेच देशविदेशातील पर्यटकांच्या उपस्थितीत आज मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यात उपस्थिती लावून गणेशाला मनोभावे निरोप दिला.

यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार राज पुरोहित, महापौर विश्वनाथ महाडेश्वर,उपमहापौर हेमांगी वरळीकर, अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते.

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने झाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीवर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. गिरगाव चौपाटी येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विदेश पर्यटकांसाठी गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या उंच व्यासपिठास मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. तसेच विदेशी पर्यटकांशी संवाद साधला तसेच गणेशोत्सव तसेच विसर्जन सोहळ्याविषयी आलेला अनुभव जाणून घेतला. पर्यटकांनीही हा सोहळा भक्तीचा मेळा असल्याची भावना व्यक्त केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget