मुंबई ( १४ सप्टेंबर २०१८ ) : महिला बंदी क्र. 144/12 काजोल आसिफ बिल्ला यांच्या सर जे.जे. रुग्णालय येथे वैद्यकीय उपचार घेत असताना झालेल्या मृत्यूच्या घटनेची दंडाधिकारी चौकशी दि. 21 सप्टेंबर 2018 रोजी दु. 3.00 वा होणार आहे. या चौकशीच्या संबंधी म्हणणे मांडण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. महिला बंदी काजोल बिल्ला यांचा मृत्यू 26 डिसेंबर 2012 रोजी जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला होता. या घटनेची चौकशी कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई शहर हे करणार आहेत. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, दंडाधिकारी शाखा, तळ मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - 40001 येथे होणार आहे. या घटनेसंबंधीचे म्हणणे चौकशीच्या वेळी सादर करण्याचे आवाहन कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा