मुंबई ( २९ सप्टेंबर २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील “वैकुंठधाम हिंदु स्मशानभूमी, रे रोड” येथील विद्युत दहिनीतील विद्युत उपकरणे दुरूस्तीसाठी, दि. ०३.१०.२०१८ ते ११.१०.२०१८ पर्यन्त तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. तथापि, पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारे जळावू लाकडवरील अग्निदाह संस्कार सेवा सदर स्मशानभूमीत सुरु राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाव्दारे कळविण्यात आले आहे. तसेच, नागरीकांना पर्यायी व्यवस्था म्हणून ‘सी’ विभागातील श्रीकांत पार्लेकर रोड वरील व मरीन लाईन्स स्टेशनच्या समोर असणा-या चंदनवाडी स्मशानभूमीतील विद्युतदाहीनी सुरु असल्याचेही प्रशासनाव्दारे कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा