मुंबई ( १९ सप्टेंबर २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभागाच्या वतीने कामगार भरतीबाबतची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम अंतीम टप्प्यात असून याबाबतचा योग्य तो निर्णय १५ ऑक्टोंबर २०१८ पर्यंत महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. याबाबतीत इच्छुक उमेदवार वारंवार पालिकेच्या संबंधीत वरिष्ठ अधिकाऱयांना दूरध्वनी/भ्रमणध्वनीवरुन विचारणा करित असतात यामुळे हा खुलासा करण्यात येत असल्याचेही पालिकेने कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा