(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कामगार विभागाचे दुसरे विशेष नोंदणी अभियान पूर्ण | मराठी १ नंबर बातम्या

कामगार विभागाचे दुसरे विशेष नोंदणी अभियान पूर्ण

40 दिवसात जवळपास दीड लाख बांधकाम कामगारांची नोंदणी

मुंबई ( १९ सप्टेंबर २०१८ ) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’अंतर्गत एकूण 40 दिवसात जवळपास दीड लाख बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात राबविण्यात आलेल्या 40 दिवसाच्या विशेष नोंदणी अभियानात सव्वा दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली होती.

कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई शुभारंभ काही ‍दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आला होता. विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 28 योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. पहिले विशेष नोंदणी अभियान 40 दिवस सुरु होते. दुसऱ्या विशेष नोंदणी अभियानाचा कालावधीही 40 दिवसांचा होता.

विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत‍ पहिल्या टप्प्यात 40 दिवसात एकूण 2 लाख 24 हजार 577 बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली होती. सहा महसुली विभागांमध्ये मुंबई विभागात सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झाली होती तर सगळ्यात कमी कामगार नोंदणी नाशिक विभागात झाली. दुसऱ्या टप्प्यात 4
जुलै 2018 ते 4 ऑगस्ट 2018 असे महिनाभर विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर 10 दिवसांसाठी हे अभियान वाढविण्यात आले आणि 14 ऑगस्ट 2018 अखेर 1 लाख 43 हजार 274 बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात जेथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले नव्हते अशा जिल्हयांमध्ये दुसऱ्या टप्प्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. या विशेष अभियान नोंदणीत सर्वांत जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी यवतमाळ जिल्ह्यात झाली तर सर्वांत कमी नोंदणी वाशिम जिल्ह्यात झाली.

जिल्हानिहाय झालेली बांधकाम कामगारांची नोंदणी पुढीलप्रमाणे :

यवतमाळ – 22 हजार 874, गोंदिया - 21 हजार 493, हिंगोली - 15 हजार 373, सोलापूर - 14 हजार 150, अहमदनगर – 10 हजार 928, चंद्रपूर – 10 हजार 548, परभणी – 9 हजार 912, नांदेड – 9 हजार 849, रत्नागिरी – 8 हजार 872, धुळे/नंदूरबार – 7 हजार 818, कोल्हापूर – 6 हजार 001, वाशिम – 5 हजार 456 असे एकूण – 1 लाख 43 हजार 274 विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार नोंदणी आवश्यक आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget