मुंबई ( १९ सप्टेंबर २०१८ ) : राज्य शासनाच्यावतीने भरविण्यात येणारा बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा 29 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे होणार आहे. हिंदूस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या हॉलमध्ये हा मेळावा भरणार असून याद्वारे नाशिक जिल्हातील होतकरू युवक युवतींना नोकरीची संधी मिळणार आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयआयटी, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट आदी विषयातील पदवीधारक या मेळाव्यात सहभाग नोंदवू शकतात. नाशिक, औरंगाबाद तसेच खान्देशातील अनेक नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून इच्छुक तरुण- तरुणींना तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा