(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मीरा बोडके आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित | मराठी १ नंबर बातम्या

मीरा बोडके आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित

मुंबई ( १७ सप्टेंबर २०१८ ) : शैक्षणिक क्षेत्रासह चित्रकला विषयात व समाज कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या “ ए “ विभागातील कुलाबा म.न.पा. उच्च प्राथ. इंग्रजी शाळेच्या चित्रकला शिक्षिका मीरा बोडके यांना नुकतेच मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा “आदर्श चित्रकला शिक्षिका महापौर पुरस्कार “महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांंचा सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र रोख रक्कम १०,००० रुपये देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला.

विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधत हा सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण ,गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, आमदार पराग आळवणी, उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, शिक्षण उपायुक्त मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मीरा बोडके यांची महानगरपालिकेत १२ वर्षे सेवा झालेली असून या काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास साधत “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र “ अंतर्गत विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी मोलाचे
योगदान दिले आहे. आतापर्यंत शासकीय एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेत ए ग्रेड-५२, बी ग्रेड- ८३,सी ग्रेड-१०६ विद्यार्थी, शासकीय इंटरमिडीएट चित्रकला ग्रेड परीक्षेत ए ग्रेड -११, बी ग्रेड-२६, सी ग्रेड- ६९ विदयार्थी यशस्वी झाले आहेत. केंद्रीय भूजल बोर्ड आयोजित राष्ट्रीय स्तरावर १ विद्यार्थिनी, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ विद्यार्थी, माझी मुंबई चित्रकला स्पर्धेत ४ विद्यार्थी पुरस्कारप्राप्त व विभागीय २१ पारितोषिके, कॅमेल आर्ट स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तर १ विद्यार्थी आणि परिमंडळ स्तर ८ विद्यार्थी, मिशन स्वच्छ भारत १ ला व ५ वा क्रमांक याशिवाय बालचित्रकला स्पर्धा, लोढा फौंडेशन,नेहरू सेंटर ,फ्रेंड्स ऑफ ट्रीज, भारत पेट्रोलियम, कलावेध, प्लास्टिकमुक्त मुंबई जपान येथे कानागावा चित्रकला स्पर्धेसाठी २ चित्रे पाठवली.डोअर स्टेप संस्थेकडून कला साहित्य विद्यार्थ्यांना मिळवून दिली आहेत.तसेच अनेक बाह्य स्पर्धेत त्यांचे विद्यार्थी सहभागी होतात. त्यांच्या विद्यार्थ्यांना एकूण ३,३६,००० रुपयांची रोख पारितोषिके आतापर्यंत मिळाली आहेत.

तसेच त्यांनी खुली रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.बालकोत्सव ,पथनाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे योगदान महत्वाचे आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget