(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जि.प.मधील कृषि अधिकाऱ्यांना आता गट ब मधील राजपत्रित संवर्ग | मराठी १ नंबर बातम्या

जि.प.मधील कृषि अधिकाऱ्यांना आता गट ब मधील राजपत्रित संवर्ग

मुंबई ( २५ सप्टेंबर २०१८ ) : जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदाचे राज्य शासनाच्या कृषि विभागात,कृषि अधिकारी, जिल्हा परिषद गट-ब (कनिष्ठ-राजपत्रित) या पदनामाने नवीन संवर्गात रुपांतरण करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या नवीन संवर्गास राजपत्रित दर्जा प्रदान करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या कृषि विभागातील कृषि अधिकारी गट-ब (कनिष्ठ) व जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदाची वेतनश्रेणी, कर्तव्ये व जबाबदाऱ्या समान आहेत. मात्र, जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी हे पद अराजपत्रित असून कृषि विभागाकडील हेच पद हे राजपत्रित दर्जाचे आहे. त्यामुळे, समानतेच्या तत्त्वाने जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी या पदाला राजपत्रित दर्जा देण्याची मागणी करण्यात येत होती. या बाबी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषि अधिकारी, जिल्हा परिषद, गट-ब (कनिष्ठ-राजपत्रित) हे राज्य सरकारी कर्मचारी असतील. त्यांना राजपत्रित दर्जा असेल. त्यांची आस्थापना राज्य शासनाच्या कृषि विभागाच्या अखत्यारित राहील. त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागात करण्यात येईल आणि कृषि विभागाच्या सध्या प्रचलित नियमांनुसार पदोन्नती होईल. जिल्हा परिषदेमधील कृषि अधिकारी गट -क (तांत्रिक) हा संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येईल. या पदांसाठी असलेल्या महाराष्ट्र विकास सेवेतील पदोन्नतीच्या पदावर आता जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (कृषि) हे पदोन्नतीस पात्र राहणार आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget