(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ब्राझील आणि इस्त्राईलच्या वाणिज्य दुतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट | मराठी १ नंबर बातम्या

ब्राझील आणि इस्त्राईलच्या वाणिज्य दुतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट

मुंबई ( २९ सप्टेंबर २०१८ ) : इस्त्राईलचे वाणिज्य दूत याकाव्ह फिन्क्लेस्टिन आणि ब्राझीलचे वाणिज्य दूत रोसीमर सुझानो यांनी काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

मुनगंटीवार यांनी राज्यात महा वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची तसेच राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कार्यक्रमांची माहिती दिली. वन- वन्यजीव रक्षण आणि संवर्धन आणि व्याघ्र विकास यावर सर्वांनी मिळून एकत्रितरित्या काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भेटीत सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांचा विकास, शैक्षणिक स्थिती अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

दोन्ही देशाच्या वाणिज्य दूतांनी त्यांच्या देशातील वृक्षाच्छादन आणि वृक्ष लागवडी संदर्भात करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुनगंटीवार यांना दिली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात खूप गांभीर्याने पाऊले टाकण्यात येत असल्याचे प्रसंशोद्गार फिन्क्लेस्टिन यांनी यावेळी काढले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget