मुंबई ( २५ सप्टेंबर २०१८ ) : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ही दोन न्यायालये नियमितपणे कार्यरत करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
मेहकर येथे सद्यस्थितीत ही दोन्ही न्यायालये जोड न्यायालय स्वरुपात 18 ऑगस्ट2013 पासून कार्यरत आहेत. मेहकर येथे ही न्यायालये नियमित कार्यरत होत असल्याने बुलढाणा येथील न्यायालयावरील ताण कमी होणार आहे. तसेच मेहकर, लोणार व सिंदखेडराजा या तालुक्यातील नागरिकांची गैरसोयदेखील दूर होणार आहे. या बैठकीत मेहकर न्यायालय नियमित कार्यरत करण्यासाठी एकूण 34 पदांच्या निर्मितीस आणि आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा