मुंबई ( ७ सप्टेंबर २०१८ ) : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 व महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार जिल्हास्तरीय तपासणीसाठी अशासकीय सदस्यांची तीन वर्षे कालावधीकरीता नियुक्ती करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक अशासकीय नामांकने मागविण्यात येत आहेत.
इच्छुकांनी नामांकन प्रस्तावाकरिता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 2 रा टप्पा, 1 ला मजला, आ.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-71-022-25232308 येथून अर्ज घेवून ते आज पासून सात दिवसांच्या आत नमूद पत्त्यावर सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा तपासणी समिती तथा जिल्हा दंडाधिकारी मुंबई उपनगर आणि सदस्य सचिव जिल्हा स्तरीय तपासणी समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी केले आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असून बाल हक्क काळजी संरक्षण आणि आपल्या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असावा. वय 35 ते 65 वर्षा दरम्यान असावे. जिल्ह्यातील प्रवास करायची तयारी असावी. जिल्ह्यात प्रवास करताना शासन नियमाप्रमाणे प्रवास भत्ता अनुज्ञेय राहील. या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय असणार नाही. अशासकीय सदस्य नियुक्तीचा कालावधी वेळ तीन वर्ष राहील. अर्जदार हा बालकांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही निवासी संस्थेच्या संबधित नसावा, असे सुचनेत नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा