(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण | मराठी १ नंबर बातम्या

सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण

मुंबई ( ७ सप्टेंबर २०१८ ) : तंत्रशिक्षण आणि वैदयकीय शिक्षण अभ्यासक्रमाची सामाईक अणि केंद्रभूत प्रवेश परीक्षा प्रक्रिया 31 ऑगस्ट 2018 अखेर पूर्ण झाली असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त ए. ई. रावते यांनी दिली.

सीईटी कक्षामार्फत राज्यातील शासकीय, शासन अनुदानित, खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. यामध्ये तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण, आयुष,कला, कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय या विदया शाखांचा समावेश आहे.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकरिता एकूण 1 लाख 94 हजार 770 विद्यार्थ्यांनी यापैकी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता राज्यातील एकूण 347 संस्थांमधून 73 हजार 934विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर इतर तत्सम अभ्यासक्रमांकरिता 1 लाख 20 हजार 836विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय आणि शासनमान्यता प्राप्त आणि महानगरपालिकेच्या एकूण 23 महाविद्यालयातील 3 हजार 160 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर खासगी विनाअनुदानित 16 संस्थांमध्ये एकूण 1 हजार 820विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उच्च शिक्षण, आयुष, कृषी विषयक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पगतीपथावर आहे.

सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संगणकीकृत असल्याने पारदर्शी पध्दतीने सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. संस्थानिहाय, प्रवर्गनिहाय माहिती, गुणानुक्रम, कट ऑफ गुण इत्यादी विषयक संपूर्ण माहिती प्रत्येक प्रवेश फेरीनिहाय संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता स्वतंत्रपणे हेल्पलाईन आणि संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget