(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बँक ऑफ महाराष्ट्राने साजरा केला सीकेटीत शिक्षक दिन | मराठी १ नंबर बातम्या

बँक ऑफ महाराष्ट्राने साजरा केला सीकेटीत शिक्षक दिन

पनवेल (प्रतिनिधी) : बँक ऑफ महाराष्ट्राने खांदा कॉलनी येथील सी. के. टी. महाविद्यालयात शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा केला. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र पनवेल शाखेचे मुख्य प्रबंधक डी .के. परमार, नवीन पनवेल शाखेचे शाखाप्रबंधक विजय कुमार पाटील, सी. के. टी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ . एलिझाबेथ म्यॅथूस, डॉ . एस. के. पाटील ,डॉ. यू. टी . भंडारी व बँकेचे विशेष सहायक व विपणन सदस्य अरविंद मोरे उपस्थित होते.

अरविंद मोरे यांनी बँके तर्फे उपस्थित शिक्षकांना शुभेछ्या देऊन बँक सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करते व बँक शिक्षकांचे मूल्य जाणते असे आपल्या प्रास्ताविकात विधीत केले . या प्रसंगी डॉ . एलिझाबेथ म्यॅथूस यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगून बँकेच्या प्रति आभार मानले. या प्रसंगी बँकेतर्फे पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सर्व उपस्थित प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .येवले यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget