(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शासकीय अध्यापक महाविद्यालयाने साजरा केला शिक्षक दिन | मराठी १ नंबर बातम्या

शासकीय अध्यापक महाविद्यालयाने साजरा केला शिक्षक दिन

पनवेल (प्रतिनिधी ) : शिक्षक दिनाचे अवचित्य साधून पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाने आज (दि. ०५) मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा केला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . रमा भोसले, बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहायक व विपणन सदस्य अरविंद मोरे , महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ .जोशी सर, डॉ .रमेश भोसले, डॉ. सुविद्या सरवणकर, डॉ . मीना भारती, डॉ . सुनीता लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी सोनाली कोळी, सुरेश गावंड, विनिता खेर, संगीत सोळंके, अमरजाई कोकणकर, धरती घरत, प्रज्ञा वर्तक, आदींनी शिक्षक दिनानिमित्त आपले मत मांडले. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे अरविंद मोरे यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थाना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी अरविंद मोरे म्हणाले कि, आपला भारत देश विविध उत्सव साजरा करणारा देश असून सोबतच आपण अनेक कृतज्ञता दिवस साजरे केले जातात. त्यामधील शिक्षक दिन अत्यंत महत्वाचा व आदर व्यक्त करणारा उत्सव आहे. शिखक म्हणजेच गुरु आहेत, त्यामुळे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज बँक ऑफ महाराष्ट्र शिक्षक दिन साजरा करत आहे.

डॉ. रमा भोसले यांनी म्हंटले कि, समाजाला साक्षर आणि सक्षम करण्याची जबाबदारी शिक्षणाची आहे, त्यामुळे शिक्षकांकडून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, हि आमची अपेक्षा असते आणि त्यावर शिक्षक आपली मेहनतीने जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असतात. हे महाविद्यालय शिक्षक घडवते त्यामुळे आमची आदर्श शिक्षक घडविण्याची अधिक जबाबदारी आहे, असे सांगत या शिक्षक दिन उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश वेडगा आणि प्रणाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अंशुजा कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश गोदाळे, योगेश वेडगा, अजय उंबरसाडा यांनी करण्यासाठी रुपेश गोदाळे, योगेश वेडगा, अजय उंबरसाडा यांनी विशेष मेहनत घेतली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget