(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रावण दहनास भीम आर्मीचा विरोध | मराठी १ नंबर बातम्या

रावण दहनास भीम आर्मीचा विरोध

मुंबई ( ८ ऑक्टोबर २०१८ ) : दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी होत असलेल्या रावण दहनास भीम आर्मी या सामाजिक संघटनेने प्रखर विरोध केला आहे . श्रीलंकेसह दक्षिण भारतात पूजा होत असलेल्या महात्मा व आदर्श राजा रावणाचे महाराष्ट्रासह काही राज्यात दहन केले जात असून हि प्रथा त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी दिली यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांना निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लंकाधिपती रावण हा प्रकांडपंडित,दानशूर पराक्रमी व तत्त्वशील राजा होता . मात्र आपली बहीण सुपरणखेला विद्रुप केलेल्या लक्ष्मणाला धडा शिकविण्यासाठी रावणाने सीतेला पळवून नेले असले तरी तिचा अवमान किंवा शीलभंग कधीच केला नाही अशी आख्यायिका आहे . मात्र तरीही सीतेला पळवून नेले आणि म्हणून रामाने त्याची हत्या केली , रावणाला दहा तोंडे होती तो असुर म्हणजे राक्षस होता अशी प्रतिमा रंगवून रावणाला खलनायक ठरवत त्याचे दहन केले जात आहे अशी नाराजी कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

प्रत्यक्षात वाईट प्रवुत्तीचे होळी पेटवून प्रतीकात्मक दहन केले जाते मात्र तरीही रावणाला खलनायक ठरवून दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते याविषयी देशभरात नाराजीचा सूर उमटत आहे श्रीलंकेसह दक्षिण भारतात रावणाला आदर्श मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्यामार्फत रावणाची पूजा अर्चा केली जाते. या वर्गाकडून देखील रावण दहनास मोठ्या प्रमाणावर विरोध कला जात आहे महाराष्ट्रात देखील अज्ञान किंवा प्रथेच्या नावावर चालणार हा प्रकार रोखण्यात यावा , रावणाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी कांबळे यांनी केली आहे सोबतच रावण दहन करणाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडसंहिता १८६० अंतर्गत १५३,१५३ अ २९५,२९८, मुंबई पोलीस कायद्यान्वये १३१,१३४,व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget