(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 'कुपरेज उद्यान, बॅण्‍ड स्‍टॅन्‍ड' पुनर्स्‍थापन सोहळा संपन्‍न | मराठी १ नंबर बातम्या

'कुपरेज उद्यान, बॅण्‍ड स्‍टॅन्‍ड' पुनर्स्‍थापन सोहळा संपन्‍न

मुंबई ( १० ऑक्टोबर २०१८ ) : कुलाबा भागात असणारे बृहन्‍मुंबई महापालिकेच्या कुपरेज उद्यानातील 'बॅण्‍ड स्‍टॅन्‍ड' व मुख्य टपाल कचेरी समोर असणारे ‘देवीदास प्रभुदास कोठारी प्‍याऊ’; या दोन्ही वास्तुंचा पुनर्स्‍थापना सोहळा मुंबईचे महापौर प्रिं. विश्र्वनाथ महाडेश्र्वर उपस्थितीत आणि युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आज (दिनांक १० ऑक्टोबर २०१८) सायंकाळी संपन्‍न झाला. याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, मा.आमदार राहुल नार्वेकर, स्‍थानिक नगरसेविका सुजाता सानप, हर्षता नार्वेकर, व नगरसेवक मकरंद नार्वेकर, उप आयुक्‍त (परिमंडळ-१) डॉ. हर्षद काळे, प्रभारी संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) सलील उपश्याम, सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर व माजी नगरसेवक गणेश सानप, विभाग प्रमुख पाडुरंग सकपाळ यांच्यासह स्‍थानिक नागरिक मोठय़ा संख्‍येने उपस्थित होते.

‘कुपरेज उद्यानातील बॅण्‍ड स्‍टॅन्‍ड’विषयी

सन १८६७ मध्‍ये 'एस्‍प्‍लनेड फी फंड कमिटी'ने कुपरेज मैदानातील या बॅण्‍ड स्‍टॅन्‍ड’ ची उभारणी केली. मादाम कामा मार्ग (क्‍वीन्स रोड) आणि कुपरेज मार्ग (वुड हाऊस) लगत असलेल्‍या या 'बॅण्‍ड स्‍टॅन्‍ड'वर ऑक्‍सफोर्डशायर इन्‍फट्री, मरीन बटालियन अशा त्‍याकाळच्‍या अनेक मातब्‍बर वाद्यवृंदांचे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले जात असत. अष्‍टकोनाकृती आकाराचे जोते, त्‍यावर उभारलेले लाकडी खांब आणि त्‍यावर लाकडी फळ्यांचे छप्‍पर असे त्‍याचे स्‍वरुप होते. या 'बॅन्‍ड स्‍टॅन्‍ड'ला नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. बृहन्‍मुंबई महापालिकेने सन २०१७ मध्‍ये, ‘वास्‍तुविधान प्रोजेक्‍ट’ या संवर्धन स्‍थापत्‍य शास्‍त्रज्ञ आणि जिर्णोधार कॉन्‍झर्व्‍हेटर्स या कंत्राटदाराची नियुक्‍ती करुन दुरावस्‍थेत असलेल्‍या या बॅण्‍ड स्‍टॅन्‍डला पुनर्जिवित केले आहे. बृहन्‍मुबई महापालिकेने या व अशा ऐतिहासिक वारसा असणाऱया वास्‍तुंचे संवर्धन करुन मुंबईकरांची सायंकाळ संगीतमय करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

‘देवीदास प्रभुदास कोठारी प्‍याऊ’ विषयी

१९ व्‍या आणि २० व्‍या शतकामध्ये मुंबई शहरात अनेक प्याऊ किंवा पाणपोया बांधल्‍या गेल्‍या. मुंबई शहराच्‍या इतिहासाचे साक्षीदार असणारे आणि वास्‍तुकलेचे अद्वितीय नमुने असलेले हे प्‍याऊ शहराच्‍या सामाजिक, सांस्‍कृतिक परंपरेचे एक महत्‍वाचे घटक आहेत. त्याकाळी काही दानशूर व्‍यक्तिंनी त्‍यांच्‍या आप्‍तेष्‍टांच्‍या स्‍मृतिप्रि‍त्‍यर्थ तसेच समाजकल्‍याणासाठी प्‍याऊ लोकार्पण केले होते. यापैकीच एक आहे, 'देवीदास प्रभुदास कोठारी प्याऊ'. देवीदास प्रभुदास कोठारी यांनी १९२३ साली त्‍यांची दिवंगत कन्‍या लिलावती त्रिभुवनदास यांच्‍या स्‍मरणार्थ हा प्‍याऊ बांधला. चौकोनी आकाराच्‍या या प्‍याऊचे बांधकाम दगडामध्‍ये आहे. ज्‍यात पोरबंदर (लाइमस्‍टोन), मालाड (ट्रेचाईट स्‍टोन) आणि लाल आग्रा (सॅन्‍डस्‍टोन) या दगडाचा वापर करण्‍यात आला आहे. सुंदर कोरीव काम, रेखीव मिनार या कलाकुसरीने नटलेला प्‍याऊ म्‍हणजे इंडो-सॅरसेनिक स्‍थापत्‍य शैलीचा प्रभाव असलेले एक उत्तम उदाहरण आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पुरातत्‍व खात्याकडून करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रि‍येच्या निमित्ताने मुंबईतील सांस्‍कृतिक व ऐतिहासिक वारसा असलेल्‍या एक समृद्ध वारसा जतन करण्‍याचे काम करण्यासह वाटसरुना पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय उपलब्‍ध करुन देण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget