(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जोगेश्‍वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा मनपा रुग्णालयात तीन महिन्यात डायलिसीस सेंटर सुरू होणार | मराठी १ नंबर बातम्या

जोगेश्‍वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा मनपा रुग्णालयात तीन महिन्यात डायलिसीस सेंटर सुरू होणार

मुंबई ( १२ ऑक्टोबर २०१८ ) : दोनवेळा टेंडर काढूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने गेली अनेक वर्ष रखडलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा मनपा रुग्णालयातील डायलिसीसी सेंटर येत्या तीन महिन्यात सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन रुग्णालयाचे अधिष्ठात डॉ. गणेश शिंदे यांनी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा मनपा रुग्णालयात रुग्णांना भेडसवणार्‍या विविध समस्यांबाबत स्थानिकांनी जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार तसेच राज्यमंत्री वायकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत राज्यमंत्री यांनी शुक्रवारी या रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक बाळा नर, जोगेश्‍वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, कैलाशनाथ पाठक, शालिनी सावंत, रचना सावंत, शाखाप्रमुख, रुग्णालयाचे अधिष्ठात डॉ. गणेश शिंदे, सुप्रिटन्ड डॉ. हरबत सिंग, डॉ. दक्षा शहा, डॉ. राजेंद्र बच्छाव, डॉ. राहुल महाले तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

या रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी दोनवेळा टेंडर मागविण्यात आली होती. मात्र त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा नव्याने टेेंडर मागविण्यात आली असून टेंडर भरण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत आहे. आलेल्या टेंडरचा अभ्यास करुन येत्या तीन महिन्यांमध्ये १० खाटांचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर या रुग्णालयात सर्जिकल इंटेन्सीव केअर युनिट (एसआसीयु) तसेच मेडिकल इंटेन्सीव केअर युनिट (एमआयसीयु) लवकर सरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. हरबत सिंग यांनी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिली. या रुग्णालयात एकुण १४४ कर्मचार्‍यांची आवश्यकता असून सध्यस्थितीत येथे ८४ कर्मचारी काम करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासुन रुग्णालयात विविध जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा लवकर भरण्यात यावा, अशी मागणी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी राज्यमंत्री यांच्याकडे केली. या रिक्त जागा भरण्यासाठी ङ्गाईलही मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी राज्यमंत्री यांना दिली. याची गंभिर दखल घेत राज्यमंत्री वायकर यांनी तात्काळ उपायुक्त सुनिल धामणे यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयातील रिक्त जागा भरण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सुचना केली. त्यानुसार या रुग्णालयातील रिक्त
जागा भरण्याची कार्यवाही लवकरच पुर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासनही धामणे यांनी राज्यमंत्री यांना दिले.

या रुग्णालयात राजीव गांधी जिवनदायी योजनाही तात्काळ सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर आसीयुमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांची यादी आयसीयुच्या बाहेर लावण्यात यावी, अशी सुचनाही राज्यमंत्री यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना केली. रुग्णालयातील साङ्ग सङ्गाईचे कंत्राट ज्यांना दिले आहे ते जर योग्यरित्या करीत नसतील तर त्यांचे कंत्राट रद्द करावेत, असे निर्देशही यांनी यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget