(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘आपलं मंत्रालय’चा दिवाळी अंक प्रकाशित | मराठी १ नंबर बातम्या

‘आपलं मंत्रालय’चा दिवाळी अंक प्रकाशित

मुंबई ( १५ ऑक्टोबर २०१८ ) : ‘आपलं मंत्रालय’ या अभिनव उपक्रमाद्वारे मंत्रालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. तसेच या माध्यमातून मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आज येथे काढले.

आपलं मंत्रालय मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन व या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, आपलं मंत्रालय टीम व पुरस्कार्थींचे गगराणी यांनी अभिनंदन केले.

हा कार्यक्रम वाचन प्रेरणा दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला. यावेळी आपलं मंत्रालयच्या दिवाळी अंकाचे अतिथी संपादक व वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मराठी भाषा विभागाच्या सहसचिव अपर्णा गावडे, संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, शिवाजी मानकर (वृत्त), राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग.दि. कुलथे व संपादक सुरेश वांदिले उपस्थित होते.

आपलं मंत्रालय या दिवाळी अंकाचे प्रकाशन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘हा दिवाळी अंक दर्जेदार झाला असून छपाई व मांडणीही उत्कृष्ट झाली आहे’, असे गद्रे म्हणाले. या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिकांचे वितरण गगराणी, गद्रे व ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपलं मंत्रालयाच्या कार्यकारी संपादक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी केले.

वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक
आपलं मंत्रालयच्या या दिवाळी अंकात कथा, आठवणी, कविता, अनुभव, प्रवास वर्णन, विनोदी चुटकुले, व्यंगचित्रे,छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असल्याने हा अंक वाचनीय व संग्राह्य झाला आहे.

विविध स्पर्धांचे पुरस्कार विजेते
एकपेक्षा जास्त पुरस्काराचे मानकरी : अतुल नरहरी कुलकर्णी, कक्ष अधिकारी, वित्त विभाग यांना आपलं मंत्रालय मासिकातर्फे ‘पर्सन ऑफ द आपलं मंत्रालय’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. कुलकर्णी यांना कविता व लेख स्पर्धेत प्रथम क्रमांक, व्यंगचित्र स्पर्धेत द्वितीय क्रमांक, गजल/भावगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक, अनुभव स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळाला आहे. रवींद्र पांडुरंग पानसरे, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना गजल/भावगीत आणि अनुभव स्पर्धेत द्वितीय क्रमांक, छायाचित्र स्पर्धेत तृतीय क्रमांक आणि कथा व रेसिपी स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळाला आहे. अजय भोसले,कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग यांना गजल/भावगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक, कविता व चुटकुले /विनोद स्पर्धेत द्वितीय क्रमांक, व्यंगचित्र स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. प्रशांत सुर्यकांत शिर्के, सहायक कक्ष अधिकारी, महिला व बालविकास विभाग यांना चुटकुले/विनोद व रेसिपी स्पर्धेत प्रथम क्रमांक, कविता स्पर्धेत तृतीय क्रमांक, लेख स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळाला आहे. सारिका निलेश चौधरी, नियोजन विभाग यांना कथा व लेख स्पर्धेत तृतीय क्रमांक व गजल/भावगीत या स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळाला आहे. भरत लब्दे, सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग यांना गजल/भावगीत या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक तर अनुभव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

इतर पुरस्कार : कथा स्पर्धेत अभय. के. येडसीकर, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग यांना प्रथम क्रमांक, किरण शार्दुल,कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग यांना द्वितीय क्रमांक तर पद्मजा पाठक, सामान्य प्रशासन विभाग चतुर्थ क्रमांक मिळाला आहे. कविता स्पर्धेत प्रसाद पवार, मुख्य सचिव कार्यालय यांना चतुर्थ क्रमांक वृषाली सचिन चवाथे, कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय यांना पाचवा क्रमांक मिळाला तर छायाचित्र स्पर्धेत दुर्गाप्रसाद मैलावरम, अवर सचिव, आदिवासी विकास विभाग यांना प्रथम क्रमांक, प्रशांत पुं. वाघ, कक्ष अधिकारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांना द्वितीय क्रमांक,राजेंद्र कुमटगी कक्ष अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग चतुर्थ क्रमांक तर मानसी साठे, कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग पाचवा क्रमांक मिळाला. व्यंगचित्र स्पर्धेत निखिल ए. डगरे, नियोजन विभाग/रोहयो यांना प्रथम क्रमांक मिळाला. अनुभव स्पर्धेत भाग्यश्री भाईडकर, कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग यांन तृतीय क्रमांक तर अनिल गुंजाळ, शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय यांना चतुर्थ क्रमांक मिळाला. रेसिपी स्पर्धेत वर्षा जोशी, कक्ष अधिकारी,मराठी भाषा विभाग यांना द्वितीय क्रमांक, कु. वर्षा रमेश पाटील, सहायक कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग यांना तृतीय क्रमांक तर चित्रा धनंजय चाचड, कार्यासन अधिकारी, जलसंपदा विभाग यांना चतुर्थ क्रमांक मिळाला. लेख स्पर्धेत केदार प्रताप पाटील, कक्ष अधिकारी, महसूल व वने यांना द्वितीय क्रमांक तर सविता सावंत, कक्ष अधिकारी, वित्त विभाग विभाग यांना पाचवा क्रमांक मिळाला. गणेश सजावट स्पर्धेत पंकज कुंभार, वन विभाग यांना प्रथम क्रमांक राजश्री उदय बापट, मराठी भाषा विभाग यांना द्वितीय क्रमांक तर संजय इंगळे, उपसचिव, उद्योग व ऊर्जा विभाग यांना तृतीय क्रमांक मिळाला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget