(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महात्मा गांधी जयंती निमित्त सायन किल्ल्यावर मेगा स्वच्छता मोहिम - १ हजार नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग | मराठी १ नंबर बातम्या

महात्मा गांधी जयंती निमित्त सायन किल्ल्यावर मेगा स्वच्छता मोहिम - १ हजार नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबई ( २ ऑक्टोबर २०१८ ) : संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली 23 आठवडे सातत्याने सायन किल्ल्याची स्वच्छता सुरु असून आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत येथे मेगा स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेत सुमारे 1000 पेक्षा जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गड-किल्ले संवर्धन मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. गेली 23 आठवडे सातत्याने संगम प्रतिष्ठान संस्था सायन किल्ल्याची स्वच्छता करत आहे. याकरिता मनपा आणि पुरातत्व विभागाचे सहकार्य लाभत आहे. संगम प्रतिष्ठान संस्थेमार्फत स्वच्छते सोबत आणि गड-किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी जननागृती मोहिम ही सायन किल्ल्यावर सुरु आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत येथे मेगा स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आल्याने संगम प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते भारावून गेले.

एफ.उत्तर विभागातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका राजश्री राजेश शिरवाडकर यांनी स्थानिक ये.एल.एम., स्थानिक विभागातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी - पालक, मनपा कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच स्थानिक रहिवाश्यांच्या सहकार्याने मेगा स्व्छता अभियान सायन किल्यावर यशस्वीरित्या पार पाडले.

राजेश शिरवाडकर आणि नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने संगम प्रतिष्ठान ची ही चळवळ आता लोकाभिमुख होऊन पुरातत्व विभागातर्फे आता या सायन किल्ल्याची डागडूजी आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी संगम प्रतिष्ठान पाठपुरावा करेल, असे संस्थेच्या सचिव कोमल घाग यानी यावेळी सांगितल्रे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget