मुंबई ( १४ ऑक्टोबर २०१८ ) : संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने दर रविवारी सायन किल्ल्याची स्वच्छता सुरु असून आज 25 आठवडे पूर्ण झाले. पण रजत सप्ताह थाटामाटात साजरा न करता एक नवा आदर्श संगम प्रतिष्ठान ने सर्वांसमोर ठेवला आहे.
नेहमीप्रमाणे संगम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी सायन किल्ल्याची स्वछता केली. त्यानंतर घरी न जाता वा रजत सप्ताह थाटामाटात साजरा न करता एफ उत्तर विभागातील अन्टोपहिल परिसरातील मनपाच्या अधिकृत सुखा कचरा वर्गीकरण केंद्रावर गेले. येथे संगम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी कचरावेचकांच्या हातात हात घालून संपूर्ण परिसर चकाचक केला.

गेली 5 वर्ष अव्याहतपणे काम करणा-या या केंद्रावरील कचरवेचकांचे मनोबल वाढविणे तसेच मनपा चा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ''माझा कचरा माझी जबाबदारी'' याला न्याय देण्यासाठी संगम प्रतिष्ठानने एक पाऊल पूढे टाकत असल्याचे संगम प्रतिष्ठान च्या सचिव कोमल घाग यानी सांगितले. तसेच त्यांनी मनपा एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे आणि घन कचरा व्यावस्थापन विभागातील सर्वच अधिकाऱ्यांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा